Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

Ram Jadhav kolhar, Mobile Number- 99999 99999

कोल्हार परिसरातील कोणतीही न्युज आपण आम्हाला आमच्या व्हाट्सअँप नंबर वर सेंड करू शकता ती न्यूज आम्ही आपल्या मोबाइल नंबर व नावाने प्रसिद्ध करू .
------------------------------------------------------------------------

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली. यानिमित्त अकोलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला संबोधित करण्यासाठी फडणवीस यांचा ताफा आला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती शर्मिला येवलेने जोरजोरात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने निळ्या शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मध्येच रस्त्यावर फुगा पडून फुटल्याने रस्त्यावर शाई पसरली होती. या तरुणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, कुकडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.
पिचड भाजपमध्ये
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधूकर पिचड यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
कैलास मोटे  कोल्हार,  मो-999 99 999 99
------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment