श्री पवन पुत्र हनुमानाला शेंदुर का लावतात (Pawan Putra Hanuman)
श्री पवन पुत्र हनुमानाला (बजरंगबली) शेंदुर का लावतात? Pawan Putra Hanuman
रामायणाच्या कथे नुसार एकदा जगत माता जानकी सीता आपल्या भांगा मध्ये शेंदूर लावत होती, त्यावेळी अचानक तिथे हनुमान आले आणि सीता माताला शेंदुर लावताना पाहुन म्हणाले, "माता हे तुम्ही आपल्या भांगा मध्ये काय लावत आहे? का लावतात? ते लावल्याने काय होते?" असे अनेक प्रश्न माता सीता ला विचारले. (Pawan Putra Hanuman) हनुमानाचा प्रश्न ऐकून सीता माता काही क्षण गप बसली, नंतर म्हणाली, "हा सेंदुर आहे. हे लावल्याने प्रभु श्री राम यांचे आयुष्य वाढेल आणि ते नेहमी माझ्या वर प्रसन्न राहतील. (Pawan Putra Hanuman) हनुमान जी तेथून निघुन गेले आणि विचार करू लागले कि जर आपण "चिमुटभर शेंदुर लावल्याने आपल्या प्रभु राम चंद्राचे आयुष्य जर दीर्घ आणि प्रसन्न तेचे होत असेल तर का नाही मी माझ्या संपूर्ण शरीराला शेंदूर लावून प्रभुला अजरामर बनवु , आणि (Pawan Putra Hanuman) हनुमानाने अगदी तसेचं केले.संपूर्ण शरीराला शेंदूर लावुन हनुमान जी दरबारात पोहचले आणि श्री रामाला म्हणाले, "प्रभु प्रसन्न रहा" (Pawan Putra Hanuman) हनुमानाच्या अंगावरील शेंदुर पाहुन श्री राम व सर्व दरबार हसु लागला आणि मग प्रभु श्री राम म्हणाले वत्सा हि काय अवस्था बनवली आहे, का आपण सर्व शरीराला शेंदूर लावला आहे? तेव्हा (Pawan Putra Hanuman) हनुमानाने सर्व वृत्तांत सांगितला . सर्व ऐकून श्री राम अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले वत्स तुझ्या सारखा माझा भक्त दुसरा कोणी नाही. त्या नंतर त्यांनी (Pawan Putra Hanuman) हनुमानाला अमरत्व प्रदान केले. तेव्हा पासुन (Pawan Putra Hanuman) हनुमानावर शेंदुर चढवला जातो.
No comments:
Post a Comment