एकादशीचे महत्त्व काय ? एकादशी का करावी? ह्या व्रताचे फायदे कोणते ? त्या दिवशी कोणते वाचन करावे ?
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एकादशी हे व्रत केल्याने चांगल्या कामाचे फलित लवकर मिळते. म्हणून प्रत्येकानेच खरे तर हे व्रत करावे. प्रतेक महिन्यात दोन एकादशा असतात. या दोन्ही दिवशी प्रत्येकाने जरुरी पुरते उपवासाचे पदार्थ फल आहार खावेत त्या दिवशी इतर भोजन करू नये व सारा दिवस ईश्वर चिंतनात घालावा या दिवशी ब्राह्म चर्ये पालन, सत्य भाषण करून रात्री विष्णसहस्त्रनाम, हरिपाठ, शिवसहस्त्रनाम, रुद्र, शिवलीलामृत या पैकी जमेल त्याचे वाचन तसेच चिंतन करावे. या दिवशी उपवासाचे पदार्थ मन सोक्त न खाता अगदी जरुरी पुरतेच खावेत, कारण पोटाला विश्रांती देणे हा हि एकादशी व्रताचा एक उद्देश आहे. उपासनेत संयमाला फार महत्व आहे. एकादशी हा आपल्याला संयम शिकविते कारण या दिवशी खाण्या पिण्याववर सहाजिकच खूप नियंत्रण येते. या दिवशी व्रतस्त राहिल्याने काम वासने वर हि आपोआप नियंत्रण येते, तसेच एकादशीच्या निमित्ताने मनुष्याच्या हातून ईश्वराची जास्त सेवा घडते. त्याचा नाम स्मरणात दिवस आनंदात जातो शरीराला व मनाला अशा प्रकारे ईश्वरी उपासनेची सवय लागावी या साठीच आमच्या पूर्वजांनी अतिशय दूरदर्शी पणे अशा प्रकारच्या व्रतःची योजना केली आहे






No comments:
Post a Comment